दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर विनामूल्य – सराव परीक्षा
October 11, 2011 27 Comments
दिनांक : सोमवार, 10 ऑक्टोबर 2011
|| Creating a Knowledge Lit World ||
October 11, 2011 27 Comments
दिनांक : सोमवार, 10 ऑक्टोबर 2011
September 1, 2011 10 Comments
August 22, 2011 Leave a comment
शासकीय योजना अधिक पारदर्शकपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची मदत घेणार - मुख्यमंत्री
शनिवार, २० ऑगस्ट, २०११
महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि ई-गव्हर्नन्स आदी उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. यापुढे विविध विभागांच्या योजना अधिक पारदर्शकपणे आणि सुव्यवस्थितपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य ज्ञान महामंडळाची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महामंडळाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात बोलताना जाहीर केले.
एमकेसीएलचा दशकपूर्ती समारंभ शनिवारी मुंबईतील नेहरु तारांगण येथे आयोजित करण्यात आला होता. उप मुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, एमकेसीएलचे सर्व भागधारक, सदस्य, विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
देशात संगणक क्रांतीचा शुभारंभ करणाऱ्या स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी स्थापन करण्यात आलेल्या एमकेसीएलने दहा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर खूपच चांगले काम केले आहे, अशी प्रशंसा करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, तुटपुंज्या भांडवलावर सुरु झालेल्या या कंपनीने मिळालेल्या संधीचे सोने केले. माहिती व तंत्रज्ञानाच्या बळावरच भारत महासत्ता बनू शकणार आहे. त्यासाठी आपल्याला संगणक आणि अंकीय शास्त्राच्या ज्ञानाचा जास्तीतजास्त प्रसार करणे गरजेचे आहे. एमकेसीएल नेमके हेच काम करीत आहे.
हार्डवेअर क्षेत्रात प्रचंड क्रांती होत आहे. अशावेळी वेगवेगळ्या यंत्राचा शोध लावणारे शास्त्रज्ञ देशात निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी आणि भाषिक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
दहा वर्षात ६० लाखांपेक्षा जास्त लोकांना संगणक साक्षर केल्याबद्दल एमकेसीएलच्या सर्व संबंधितांचे अभिनंदन करुन उप मुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, फायद्यात सुरु असणारे शासनाचे हे एकमेव महामंडळ असावे. आज असे एकही क्षेत्र नाही की, ज्यात संगणकाचा उपयोग केला जात नाही. जागतिक स्पर्धेच्या युगात संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान ही महत्वाची शस्त्रे आहेत. संगणक ही आज गरजेची वस्तू बनली आहे. संगणक साक्षरता नसलेल्या व्यक्तीला यापुढे निरक्षर समजले जाऊ लागले आहे. यामुळेच एमकेसीएलच्या कार्याचे महत्व अधिक जाणवू लागले आहे. महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, ओरिसा आणि परदेशात सिंगापूर, सौदी अरेबिया, घाना आदि देशात एमकेसीएलनी संगणक साक्षरतेचे अभ्यासक्रम सुरु करुन या क्षेत्रातील आपले स्थान पक्के केले आहे. डिजीटल स्कुलच्या प्रकल्पाला मिळालेल्या ई-इंडिया पुरस्कारामुळे एमकेसीएलच्या अभ्यासक्रमांचा दर्जा किती उच्च प्रतीचा आहे याची कल्पना येते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले की, नफा कमवणे हा एमकेसीएलचा उद्देश नसला तरी एमकेसीएलने आत्तापर्यंत शंभर कोटी रुपयांच्या वर रक्कम राज्य सरकारला दिली आहे. एमकेसीएलनी आत्तापर्यंत पाच हजार केंद्रांच्या माध्यमातून एक लाख युवकांना रोजगार व उपजिवीकेच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे ही एमकेसीएलची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. यापुढील दहा वर्षांत एमकेसीएल अधिक प्रभावीपणे काम करेल आणि ज्ञानाधिष्ठीत व तंत्रज्ञानाने जोडलेला समाज निर्माण करेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री श्री. सावंत यांनी एम.के.सी.एल.च्या सहकार्याने ओरिसा नॉलेज कॉर्पोरेशन लि.ची स्थापना होणार असल्याची घोषणा यावेळी केली. यासंबंधातील अभिवचन पत्र श्री.प्रवीण कुमार राऊत यांना मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमास एम.के.सी.एल.च्या ऑलिम्पियाड उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. एम.एस.सी.आय.टी.परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या अकरा भाषांतील सी.डी. चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. एम.एस.सी.आय.टी. च्या अभ्यासक्रमाचे मूळ पुस्तक लिहिणारे टिमॉथ ओलियरी यावेळी उपस्थित होते.
MAHA NEWS LINK:
August 16, 2011 Leave a comment
Press Invite
Press Invite for MKCL’s 10th Anniversary Event
at Mumbai on August 20, 2011
Greetings from MKCL!
It gives me immense pleasure to invite you for the Grand Celebration of MKCL’s 10th Anniversary. The 21st century knowledge-based socio-economic development model enabled by the IT revolution was a great gift to India by our former Prime Minister Late Shri Rajiv Gandhi. On his first birth anniversary in the 21st century i.e. on August 20, 2001, Government of Maharashtra established MKCL with a mission to bridge the Digital Divide through the propagation of IT Literacy in all the strata of the society. In order to commemorate the completion of the successful journey of MKCL over the decade, a Decennial Celebration has been organized. You are most cordially invited to join us at this function. The details of the Program are given below: Day and Date: Saturday, August 20, 2011 Time of the Entire Program: 11.00 am to 01.00 pm Venue: Nehru Centre Auditorium, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400018 Shri Sharad Pawar, Hon’ble Minister of Agriculture, Govt of India will grace the occasion as the Chief Guest and the function will be chaired by Shri. Pritviraj Chavan, Hon’ble Chief Minister of Maharashtra. Shri Ajit Pawar, Hon’ble Deputy Chief Minister of Maharashtra, Shri Dilip Walse Patil, Hon’ble Speaker of Maharashtra Legislative Assembly and Founder chairman of MKCL, Padmashree Dr. Vijay Bhatkar, Chief Architect of India’s Indigenous ARAM Supercomputers, Shri Rajesh Tope, Hon’ble Minister for Higher and Technical Education and Chairman, MKCL and Shri D P Sawant, Hon’ble Minister of State for Higher and Technical Education and Vice- Chairman, MKCL shall grace the occasion by their august presence. My senior colleagues and myself eagerly look forward to your participation in this function. I would also like to invite you to join us for the lunch at 1.10 pm at the program venue. With warm personal regards, Sincerely yours, Vivek Sawant Managing Director Ps: for more information please contact Mr Sandeep Kulkarni, 07350000370, sandeepk@mkcl.org Click here to see and download this Press Invite
- Press Invite – Marathi for MKCL 10th Anniversary Event
Press Invite for MKCL's 10th Anniversary Event at Mumbai on August 20, 2011
Click here to see and download this Press Invite
August 6, 2011 6 Comments
साठ लाख विद्यार्थ्यांचे टीचर ~ विवेक सावंत
मंगेश कोळपकरSaturday, August 06, 2011 AT 12:00 AM (IST)Tags: सक्सेस स्टोरीArticle link “Saptahik Sakal” :राज्यातल्या साठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणाऱ्या “एमकेसीएल’ या संस्थेचा विस्तार आता राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांसोबतच देशाबाहेरही होतो आहे. आधुनिक काळात शिक्षणाच्या बदलत्या समिकरणांचा वेध घेऊन त्यानुसार शिक्षण देणारे विवेक सावंत हेच “एमकेसीएल’च्या यशाचे खरे सूत्रधार म्हणावे लागतील.
देशात आयटी क्षेत्राची बूम वाढली, तसे प्रत्येकच क्षेत्रात कॉम्युटरने पदार्पण केले. कुठल्याही क्षेत्रात जायचे, तर कॉम्युटरचे किमान ज्ञान असणे गरजेचे झाले. ही गरज ओळखून एमएस-सीआयटी हा अभ्यासक्रम सुरू झाला. राज्यात अनेक ठिकाणी एमएस-सीआयटी केंद्र सुरू झाली. लहान मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकाला हा अभ्यासक्रम शिकण्याची गरज वाटू लागली. संगणक प्रशिक्षणाचं तंत्रशुद्ध शिक्षण देण्याचा हा उपक्रम चालविणारी संस्था म्हणजे एमकेसीएल, अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ. दहा वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे आणि त्याला फुलविण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला, तो विवेक सावंत यांनी.
या कालावधीत तब्बल साठ लाख लोकांनी एमएस-सीआयटीच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण घेतले. राज्यात साडेसहा हजारांहून अधिक केंद्रे असलेल्या (ऑथोराईज लर्निंग सेंटर्स – एएलसी) या संस्थेची 225 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल आहे. एक निमसरकारी संस्था असूनही तिचा लौकिक देशभर झाला आहे. राम ताकवले यांच्यासारख्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञाने समाजाची नाडी ओळखून ही संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. या संस्थेची गरज ओळखून शरद पवार, दिलीप वळसे पाटील या कल्पक राजकीय नेतृत्वाने तिची अंमलबजावणी केली.
अनेक अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेपासून संगणक व्यवसाय प्रशिक्षणाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम यशस्वी झाले आहेत. डिजिटल सिटीझन, डिजिटल सहेली, वर्ल्ड क्लास ऍकॅडमी फॉर व्होकेशनल एक्सलन्स, ई-लर्निंग, डिजिटल युनिर्व्हसिटी, टॅलेंट सर्च प्रोग्रॅम ही त्याची काही उदाहरणे. शिक्षणाचा प्रसार करतानाचा व्रत समजून सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या कुटुंबातून विवेक सावंत यांची जडणघडण झाली. त्यामुळे साधेपणा, शिस्त, ध्येयाप्रत चिकाटी हे गुण त्याच्यात उपजतच होते. आधुनिकतेची कास धरून मार्गक्रमण करताना वैचारिक स्पष्टता कायम ठेवत कार्यावर निष्ठा ठेवल्यामुळेच लहान-लहान गावांतून उद्योजक, विद्यार्थी घडविण्यात सावंत यांची “टिम-एमकेसीएल’ यशस्वी झाली आहे.
समर्थ महाराष्ट्र घडविण्याचा ध्यास असलेल्या सावंतांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव आहेच; पण आपण योग्य मार्गावर आहोत याचा त्यांना अभिमानही आहे. या कामात त्यांना दिवसाचे 24 तासही कमी पडतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे स्वतःच्या केबिनमध्ये बसून सावंत यांचा जगभर संचार सुरू असतो.
यशाची वाटचाल
कोकणातील पाळेमुळे असणाऱ्या विवेक सावंत यांचे शालेय शिक्षण नाशिकमध्ये झाले. सावंत यांनी पुणे विद्यापीठात 1977 मध्ये फिजिक्समध्ये एमएस्सी केले. 1979 ते 88 दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतानाच लोकविज्ञान चळवळीत ते सहभागी झाले. समाजाच्या नेमक्या वास्तवाची जाणीव त्यांना याच काळात झाली. वैचारिक बैठकीला अनुभवाची साथ मिळाल्यामुळे त्यांच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या. त्याचेच प्रत्यंतर त्यांनी दरम्यानच्या काळात लिहिलेल्या प्रासंगिक लेखनातून दिसून येते. क्षयरोगाचा विषाणू शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी शोधला होता. त्या घटनेला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने लिहिलेला “मारणारे मेले, मी जिवंत आहे,’ हा लेख किंवा बुवाबाजीवरचा “मुलाला आलेली शेपटी आणि नव्या बुवाचा उदय’, “शेतमजुरांचे किमान वेतन शास्त्रीय पायावर ठरवावे’ या संदर्भातील त्यांचे लेख अभ्यासपूर्ण वाटतात. पर्यावरण हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केरळमधील सायलेंट व्हॅली असो वा पुणे विद्यापीठाच्या आवारातील झाडे पाडण्याच्या मोहिमेला केलेला विरोध असो, सावंत यांच्या लेखनात साहित्यिक संस्कार आढळतात.
प्राध्यापकी सुरू असतानाच काही तरी वेगळे करण्याचा असलेला ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. 1987-88 मध्ये त्यांनी सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये पहिले उपसंचालक म्हणून काम केले. त्याचदरम्यान “सी-डॅक’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सावंत 1988 ला “सी-डॅक’मध्ये रुजू झाले. त्यानंतर तीन वर्षांत “सी-डॅक’ने पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला. त्या टिममध्ये सावंतही होतेच. एक संगणक झाला; परंतु भविष्यातही असे संगणक तयार करण्यासाठी तंत्रज्ञ घडवावे लागतील. याची जबाबदारी डॉ. भटकर सावंतांवर टाकली. त्यातूनच “ऍडव्हान्स कॉम्प्युटर ट्रेनिंग स्कूल’ तयार झाले. प्रगत संगणकाचे प्रशिक्षण देणारी ही भारतातील पहिली संस्था होती. त्यातून सावंतांचे 25 हजार विद्यार्थी घडले. “सी-डॅक’मध्ये असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतही विवेक सावंत यांनी काम केले. विधानभवनाचे संगणकीकरण करतानाच सभागृहातील भाषण अवघ्या काही क्षणांत कुठल्याही भाषेत प्रक्षेपित करण्याची यंत्रणा उभारण्यात सावंत यांचा मोलाचा वाटा होता. मुद्रांक शुल्क खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेही संगणकीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. मे 2000 मध्ये “सी-डॅक’मधून बाहेर पडल्यावर “माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण देणाऱ्या “आयस्व्केअरआयटी’ या फिनोलेक्स ग्रुपच्या संस्थेचे पहिले संचालक म्हणून ऑगस्ट 2002 पर्यंत सावंतांनी काम केले.
“एमकेसीएल’ची मुहूर्तमेढ
दरम्यान 1999 मध्ये शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. पदवीनंतर शिक्षण न संपता, निरंतर सुरू राहावे, यासाठी काय करता येईल, असे उद्दिष्ट समितीच्या डोळ्यांसमोर होते. त्या समितीत विवेक सावंत आणि इतर तिघे जण होते. संगणक साक्षरतेची कास धरून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी “एमकेसीएल’ची स्थापना करण्याबाबतचा अहवाल समितीने सादर केला. त्यानंतर दीड एक वर्षांनी “एमकेसीएल’ची स्थापना करायची व त्याची जबाबदारी सावंत यांना द्यायची निश्चित झाली. ऑगस्ट 2001 मध्ये संस्थेची कंपनी म्हणून मुंबईत नोंदणी झाली अन् पुण्यातून कामाला सुरवात झाली. सरकारी केटरिंग कॉलेजच्या एका रिकाम्या खोलीतून काम सुरू झाले.
“पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’हे रोल मॉडेल तयार करताना नव्या शिक्षणपद्धतीचे राज्यव्यापी प्रात्यक्षिक द्यायचे, दुसरीकडे ही संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायची आणि आयटी साक्षरतेचा प्रसार करून निरंतर शिक्षणाचा सुलभ, स्वस्त, परिणामकारक व परिवर्तनशील महामार्ग तयार करायचा असे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्या नुसारच “एमएस-सीआयटी’ (महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली. “एमकेसीएल’ने लहान-मोठ्या संगणक प्रशिक्षण संस्थांना हा अभ्यासक्रम शिकविण्याचे हक्क दिले. वाजवी शुल्क आणि मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, गुजराती, उडिया व फ्रेंच भाषांतून शिकविण्याची सुविधा असल्यामुळे हा अभ्यासक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. आता तर तो उर्दू माध्यमातूनही शिकविण्यात येणार आहे. अभ्यासक्रम शिकविताना विद्यार्थ्यांशी वर्तन कसे असावे, याचेही मापदंड सावंत यांनी घालून दिले असून त्यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्या धर्तीवर ई-लर्निंग माध्यमातूनही अनेक अभ्यासक्रम आता रूढ झाले आहेत. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी “वेव्ह’ हा उपक्रमही यशस्वी झाला आहे. संस्थेतील अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांची, उमेदवाराची गुणवत्ता वाढली पाहिजे, असा सावंतांचा कटाक्ष असतो.राज्याबाहेरही विस्तार
“एमकेसीएल’चा विस्तार आता राज्याबाहेरही होतो आहे. राजस्थान सरकारने 2008 मध्ये राजस्थान नॉलेज कॉर्पोरेशनची स्थापना केली आहे. मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, उत्तरप्रदेशातही चर्चा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. सौदी अरेबियामध्ये ऑक्टोबर 2007 मध्ये संस्थेच्या कामकाजाला सुरवात झाली. राजधानी रियाधमध्ये सुमारे साडेआठ हजार विद्यार्थी असून त्यात 1400 महिला आहेत. आफ्रिकेतील घानामध्येही संस्थेचे कामकाज सुरू झाले आहे. अल्पावधीतच आखाती व आफ्रिकन देशांमध्ये संस्थांचे कार्यक्षेत्र असेल, असे सावंत आत्मविश्वासाने सांगतात.
“”विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात पारंपरिक शिक्षणाबरोबरच इतर कौशल्येही आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण यांची सांगड घालणे गरजेचे आहे. कामातून ज्ञानप्राप्ती व ज्ञान प्राप्तीतून अधिक फलदायी काम करण्याची करायला हवे” असे सावंत यांचे मत आहे.
पाच तरी नोबेल शास्त्रज्ञ हवे
महाराष्ट्रातून किमान पाच नोबेल शास्त्र घडविण्याचे सावंत यांचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रज्ञा संवर्धन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र विज्ञान ऑलिंपियाडच्या माध्यमातून ते घडवीत आहेत. त्याचीच परिणती म्हणून संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडसाठी निवड झाली आहे. शालेय स्तरापासूनच त्यांच्या विकासाचे उद्दिष्ट बाळगले, तर संशोधनासारख्या क्षेत्रातून पाच विद्यार्थ्यांचा प्रवेश नोबेल पारितोषिकापर्यंत होऊ शकतो, असे सावंत यांना वाटते.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात “एमकेसीएल’पोचविण्याचा ध्यास सावंत यांनी बाळगला आहे. तंत्रज्ञानाचे सार्वत्रीकरण होत असल्याचा फायदा तळागाळातील जनतेलाही होत आहे. या वर्गातून आधुनिकतेची कास धरली, तर समाजाचाही विकास होईल व बलशाली भारताचे स्वप्न साकार होईल. हेच ध्येय बाळगून त्यादिशेने जाणाऱ्या प्रवाहात “एमकेसीएल’ही आहे.
विवेक सावंत यांची उद्दिष्टे
1- वाढत्या विद्यार्थी संख्येला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करायच्या
2- गुणवत्ता उत्तम ठेवायची
3- शिक्षण शुल्क शक्य तितके कमी ठेवायचे
4- शिक्षण सर्वत्र म्हणजे कोनाकोपऱ्यातही उपलब्ध व्हायला हवे
5- कमीत कमी कालावधीत शिक्षण उपलब्ध करायला हवे
6- सामुदायिक तरीही व्यक्तिनिहाय शिक्षण पद्धती हवी2020 मधील भारत
मनुष्यबळ विकास खात्याच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये अमेरिकेत पावणे दोन कोटी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असेल. युरोप व जपानमध्येही तुटवडा असेल. चीनमध्येही एक कोटी जागा रिकाम्या असतील; कारण त्यांचा लोकसंख्यावाढीचा दर आपल्यापेक्षा कमी आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची गरज भागविण्यासाठी सर्व देश आपल्याकडे वळू शकतील; कारण त्या वेळी भारतात अकरा कोटींची “वर्किंग एज पॉप्युलेशन’ असेल. त्यावेळी अतिरिक्त मनुष्यबळ असणारा भारत हा जगातील एकमेव देश असेल.
काय आहे “एमकेसीएल’?
“एमकेसीएल’ ही सामाजिक कार्य करणारी संस्था नसली, तरी संस्थेने छोट्या-छोट्या गावांमधून अनेक उद्योजक घडविले आहेत. गेल्या दहा वर्षांत संस्थेचे पारदर्शी व्यवहार राहिलेत. एमकेसीएलचे स्वतःचे कर्मचारी जेमतेम दीडशे आहेत. पण, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पसरलेल्या या कोर्स सेंटर्सच्या नेटवर्कमुळे जवळपास एक लाख तरुणांना रोजगार मिळाला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातही तीस लर्निंग सेंटर्स आहेत. मुख्य म्हणजे या सर्व तरुणांना मिळालेला रोजगार हा स्थानिक पातळीवरचा आहे. एरवी रोजगारासाठी शहरात धाव घेणाऱ्या या तरुणांचा गावातच विकास होत आहे.
Scanned Images of the Feature:
Article link: http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20110806/5396804993686665839.htm
August 4, 2011 Leave a comment
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री. राजीव गांधी यांनी संगणक क्रांतीचा पुरस्कार करुन २१ व्या शतकातील ज्ञानाधिष्ठित विकासाची संकल्पना भारताला दिली. त्यांच्या २१ व्या शतकातील पहिल्या जन्मदिनाचे औचित्य लक्षात घेऊन दिनांक २० ऑगस्ट २००१ रोजी, महाराष्ट्र शासनाने समाजातील डिजिटल दरी दूर करुन व्यापक प्रमाणावर संगणक साक्षरतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ तथा MKCL या संस्थेची स्थापना केली. MKCLने ज्ञानयुगातील विकासाच्या नवनवीन संधी माहिती तंत्रज्ञानाच्या समुचित वापरातून महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. या प्रयत्नातून नव्या परिवर्तनशील ई-शिक्षणाचे अभिनव प्रारूप साकारत आहे आणि त्याला आपल्या देशात व परदेशात उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ई-शिक्षणाबराबरच महामंडळाने अभिनव ई-प्रशासन सेवा व ई-सबलीकरण सेवा राज्यात सर्वदूर उपलब्ध करुन लक्षावधी नागरिकांना डिजीटल तंत्रज्ञानाचे फायदे दैनंदिन जीवनात घेण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे. या वर्षी MKCL आपल्या यशस्वी वाटचालीचे पहिले दशक पूर्ण करुन दुस-या दशकात पदार्पण करीत आहे. यापुढेही MKCLद्वारे महाराष्ट्राच्या व देशाच्या शैक्षणिक, सामजिक आणि औद्योगिकक्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वांगीण विकास साधण्याचे बहुमोलाचे कार्य अविरत चालू राहिल…..
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल
MKCL चे राज्यव्यापी महानेटवर्क
- संपूर्ण महाराष्ट्रात संगणक प्रशिक्षणाकरिता ५०००+ अधिकृत अध्ययन केंद्रांचे महानेटवर्क.
- अद्ययावत हार्डवेअर व सॉफ्टवेअर्सने सुसज्ज असलेले ४०००० इंटरनेट-रेडी संगणकाचे राज्यव्यापी जाळे.
- राज्यातल्या शहरी, निमशहरी, ग्रामीण, आदिवासी व डोंगराळ भागांतही नेटवर्कमार्फत सक्षम ई-लर्निंग, ई-प्रशासन व ई-सबलीकरण सेवा व सुविधांचे वितरण.
- ई-लर्निंग, ई-गव्हर्नन्स व ई-एंपॉवरमेंट क्षेत्रात राज्यव्यापी सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ व बौद्धिक संपदा निर्मिती.
- दहा वर्षात महानेटवर्कची रु.१३९० कोटींची उलाढाल.
- नेटवर्कमार्फत आजपर्यंत १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त लोकांना शिक्षण-प्रशिक्षण, सेवा आणि ई-सुविधा.
विविध उपक्रम व सेवा
- ६० लाखापेक्षा जास्त जिज्ञासूंना गेल्या दहा वर्षांत MS-CIT या माफक शुल्कातील, अद्ययावत व परिपूर्ण कंप्यूटर साक्षरता कोर्समार्फत दर्जेदार प्रशिक्षण व त्यामार्फत महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे संगणक साक्षर राज्य बनविण्यात यश.
- वर्ल्ड क्लास अॅकॅडमी फॉर व्होकेशनल एक्सलन्स (WAVE) अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रमाणित रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देणारे अनेक नवे अभ्यासक्रम.
- डिजीटल युनिव्हर्सिटी प्रकल्पामार्फत १२ विद्यापीठांतील १२ लाख विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रशासकीय व शैक्षणिक ई-सुविधा.
- ‘ओअॅसिस’ या संगणक प्रणालीतून ३८ लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे सुलभ ऑनलाईन प्रवेश व १३ लाख उमेदवारांना शासकीय सेवा – प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा व माहिती सेवा.
- ‘डिजीटल स्कूल’ या शालेय ई-शिक्षण प्रणालीला राष्ट्रीय पातळीवरील मानाचा eIndia पुरस्कार.
- ‘टॅलेंट नर्चरन्स’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या उत्तमता विकास व प्रज्ञा संवर्धनासाठी विज्ञान व गणित ऑलिंपियाड अभियान, आंतरराष्टीय विज्ञान ऑलिंपियाडमध्ये भारतीय टिममध्ये प्रतिनिधित्व.
- ६ ते ८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बहुविध बुध्दिमत्ता विकासासाठी राज्यभर ‘हॉबी होम्स’ ची निर्मिती.
- ‘सेटस्’ सॉफ्टवेअर प्रणाली मार्फत विविध शासकीय महामंडळांना प्रतिवर्षी हजारो कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा खरेदीसाठी ई-टेंडरिंग सेवा.
- राजस्थान राज्य सरकारसोबत राजस्थान नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना. राजस्थानातील १,४०,८०० विद्यार्थी संगणक प्रशिक्षित.
- ओरीसा नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (OKCL) साठी ओरीसा सरकारची मान्यता
- गुजरात, कर्नाटक व गोवा राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी श्रम मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे MKCL ची परीक्षण संस्था म्हणून निवड
- देशातील १७ राज्यांमध्ये MKCL अभ्यासक्रम स्थानिक भाषांतून कार्यान्वित.
- सौदी अरेबिया मध्ये ‘एम.के.सी.एल. अरेबिया लिमिटेड’ ची स्थापना. १० हजार सौदी विद्यार्थी संगणक प्रशिक्षित.
- सिंगापूर आणि घाना या देशामध्ये MKCL– सिंगापूर आणि MKCL– घाना या संयुक्त संस्थांसाठी सामंजस्य करार
- ‘एम्प्लॉयमेंट असिस्टंटस् सर्व्हीसेस टू यूथ – EASY’ पोर्टल मार्फत तरुणांना रोजगार, शिष्यवृत्त्या, स्पर्धा परीक्षा तयारी, इ. सुविधा.
रोजगार निर्मिती
- राज्यभर शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील २५ हजार युवकांना MKCL नेटवर्कमध्ये त्यांच्याच गावात माहिती तंत्रज्ञानावर आधारित हाय-टेक रोजगार व स्वयंरोजगार.
- १ लाख युवकांना अप्रत्यक्षरित्या एम.के.सी.एल. नेटवर्कमध्ये त्यांच्या गावात रोजगार/व्यवसायाव्दारे उपजिविकेच्या संधी.