आदरणीय सावंत सरांचे दै. लोकमत च्या औरंगाबाद आवृत्ती मध्ये छापून आलेली मुलाखत

Hon'ble Sawant Sir's interview published in Lokmat newspaper

MKCL receives prestigious Appreciation Certificate from The Chief Minister’s Office, Government of Maharashtra

MKCL has worked to create a portal for ‘The Chief Minister’s Internship Program, 2015’. MKCL offered the following services:

  1. Creation of a portal for the purpose of receiving applications for the internship program
  2. Receive online applications and processing them as per the criteria defined by The Chief Minister’s Office
  3. Devising an online written test, conducting the online written test and processing the results
  4. Short-listing candidates for interview on the basis of results of the online test

This internship program was launched by Shri. Devendra Fadnavis, Hon’ble Chief Minister of Maharashtra, to invite graduates and post graduates from recognized universities and institutes for effective implementation of The Government of Maharashtra’s flagship programs. It is designed to provide an intense experience to students interested in working in the social development sector.

Please find attached the Appreciation Certificate received by MKCL for successful completion of this project.

Appreciation Certificate received from The Chief Minister's Office, Government of Maharashtra

Appreciation Certificate received from The Chief Minister’s Office, Government of Maharashtra

शासकीय परिपत्रकासंबंधीच्या वृत्तांबद्दल स्पष्टिकरण

मित्रहो,

सप्रेम नमस्कार.

विवध दैनिकात व इलेक्ट्रॉनिक माध्यमांत दिनांक ५ सप्टेंबर, २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या एका शासन परिपत्रकाबद्दलचे वृत्त टोकाच्या मतप्रदर्शनासह व अतार्किक निश्कार्षांसह प्रसिद्ध झाले. ते वाचून/बघून MKCL चे अनेक सहकारी, हितचिंतक, केंद्रचालक यांना धक्का बसला व त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. त्यामुळे मी खालील स्पष्टिकरण देत आहे.

सदर शासकीय परिपत्रकात शासकीय विभागांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सेवा घेताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबद्दल कॅगच्या खालील दोन प्रमुख शिफारशी दिलेल्या आहेत:

१.      महाराष्ट्र ज्ञान महामंडळास प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी भरती, आज्ञावली विकास अथवा अन्य कोणत्याही स्वरुपाची कामे थेटरित्या देऊ नयेत.

२.      कोणत्याही स्वरूपाचे सेवाविषयक काम देताना मुंबई वित्तीय नियम, १९५९ च्या नियम ५८ व १०७ चे पालन करूनच या महामंडळाच्या सेवा घेण्यात याव्यात.

खरे तर २००६ पासून प्रलंबित असलेल्या व कॅगने २०१३ सालीच निदर्शनास आणलेल्या प्रशासकीय त्रुटीच्या दुरुस्तीचे हे विलंबाने प्रसिध्द झालेले परिपत्रक आहे. असे परिपत्रक प्रसिध्द होण्यापूर्वीच विविध शासकीय विभागांनी MKCL ला थेटरित्या नव्हे तर खुल्या निविदा पद्धतीने कामे देण्यास गेल्या दोन वर्षापूर्वीच सुरुवात केली आहे.

तसेच २००६ मध्ये संपुष्टात आलेल्या या शासन निर्णयाचा तो अस्तित्वात असतानाही MKCL ने कुठलेही काम मिळवण्यासाठी कधीही पाठपुरावा केलेला नाही. त्याच्या अस्तित्व काळातही MKCL च्या पूर्णपणे विस्मृतीत गेलेला हा शासननिर्णय होता. वरील बातम्या प्रसिध्द झाल्यावर बारा-तेरा वर्षांपूर्वीच्या या निर्णयाच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या.

आतापर्यंत मिळालेली कामे ही MKCL ची सेवा पसंत असल्यामुळे त्या त्या शासकीय विभागांकडून व त्यांनीच केलेल्या सेवाशुल्क निश्चीतीतून वेळोवेळी मिळत गेली. क्वचित प्रसंगी पसंतीस न उतल्याने काही विभागांनी अशी कामे इतरांना दिली. काहींनी तसे करून पुन्हा ती MKCL ला दिली. कारण आतापर्यंत MKCL ला या शासन निर्णयातही कधीच मक्तेदारी(!) नव्हती व त्यामुळे ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

MKCL च्या सेवांचा दर्जा व शुल्क स्पर्धात्मकतेत कुठेच कमी नसल्यामुळे गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य सात राज्यांमधील अनेक शासकीय विभाग वरील वित्तीय नियमांनुसार निविदा काढतात व MKCL ची त्यात निवड व फेरनिवड होत असते. इतकेच नव्हे तर भारतातील नामवंत आणि मोठ्या खाजगी संस्था व कंपन्याही MKCL कडून या सेवा घेत आहेत हे मी अभिमानाने नमूद करू इछितो.

तसेच “MKCL ही कंपनी कुठल्या राजकीय पक्षाच्या मातबर नेत्याशी संबंधित आहे(!)” हे खोडसाळ विधान एकतर या वृत्तपत्रांनी मागे घ्यावे अन्यथा त्याचे पुरावे द्यावे.

“वरील कामे MKCL मार्फत करू नयेत असे शासकीय विभागांना कळविण्यात आले आहे” हे वृत्त चुकीचे असून ती थेटरित्या न देता निविदा पद्धतीने (वित्तीय नियमानुसार) करावी असा शासनाच्या परिपत्रकात  स्पष्ट उल्लेख आहे.

उपरोक्त परिपत्रकातील ‘कॅग’ च्या अहवालाचा संदर्भ हा शासकीय विभागांच्या लेखापरीक्षाणाबद्दल आहे. MKCL मध्ये शासनाचे भागभांडवल ५१% पेक्षा कमी असल्यामुळे MKCL चे लेखापरीक्षण ‘कॅग’ मार्फत होत नाही. त्यामुळे “MKCL च्या कारभाराबाबत ‘कॅग’ च्या अहवालात वित्तीय अनियमितता आढळून आल्या” हे विधान पूर्णपणे चुकीचे व बिनबुडाचे आहे.

काही वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या साध्या प्रशासनिक दुरुस्तीचे एका सनसनाटी वृत्तात रुपांतर करण्यासाठी बरेच बौद्धिक श्रम घेतले, शब्द सामर्थ्य खर्ची घातले त्याबद्दल कालाय तस्मै नम: एवढेच म्हणणे उचित ठरेल. यापुढे माध्यमातून प्रसिध्द होणाऱ्या अगदी आपल्या विरोधकांसंबंधीच्या आपल्याला क्षणिक सुखावणाऱ्या वृत्तावरही मूळ संकेतस्थळावर/ मूळ स्रोतात जावून शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये ही नम्र प्रार्थना.

MKCL ने पाठवलेले स्पष्टीकरण माध्यमे त्वरित प्रसिद्ध करतील अशी आशा करतो.

या मन:स्ताप देणाऱ्या अन्यायकारक वृत्ताच्या प्रसिद्धीनंतर तुम्ही सर्वांनी चहूबाजूंनी व तात्काळ व्यक्त केलेल्या विलक्षण सहानुभूतीबद्दल आणि MKCL वरील निर्व्याज प्रेमाच्या आणि विश्वासाच्या प्रकटनाबद्दल तुमचे किती आभार मानू? भारावून गेलो आहे..

आपला स्नेहांकित,

विवेक सावंत

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, MKCL

गर्दीत गारद्यांच्या गाफील रामशास्त्री

मित्रहो,

विद्यापीठे, परीक्षा गोंधळ आणि एमकेसीएल या शीर्षकाचा डॉ. द. ना. धनागरे यांचा महाराष्ट्र टाईम्सच्या संवाद पुरवणीत रविवार, दि. २३ ऑगस्ट २०१५ रोजी प्रसिध्द झालेला लेख आपण कदाचित वाचला असेल. या लेखात एमकेसीएलवर करण्यात आलेल्या गंभीर व निराधार आरोपांना एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक सावंत यांनी सडेतोड प्रत्तुत्तर दिले आहे. ते गर्दीत गारद्यांच्या गाफील रामशास्त्री या शीर्षकाच्या लेखाच्या स्वरूपात सोबत जोडले आहे. संक्षिप्त स्वरूपात महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार, दि. ३० ऑगस्ट,२०१५ च्या संवाद पुरवणीतही ते प्रसिध्द झाले आहे. सोबत जोडलेला मूळ लेख आपण फक्त १५-२० मिनिटांचा वेळ काढून वाचावा. आपल्या परिचितांनाही जरूर फॉरवर्ड करावा आणि सत्य जास्तीत जास्त लोकांसमोर आणण्यास मदत करावी ही नम्र विनंती.

कळावे,

आपला/आपली

Sawant Sir's Article - Part 1 of 4

Sawant Sir's Article - Part 2 of 4Sawant Sir's Article - Part 3 of 4Sawant Sir's Article - Part 4 of 4

 

‘महा आय. टी. जिनियस’ स्पर्धा

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच ITचा वापर रोजच्या जीवनात वाढवा याकरिता महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात ‘ICT’ हा विषय ५वी पासून समाविष्ट केला आहे. त्याचसोबत भारताच्या माननीय पंतप्रधानांनी नुकत्याच सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत लाखो नागरिकांना डिजिटल साक्षर करावयाचे आहे. MKCL गेली १४ वर्षे MS-CITच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता क्षेत्रात काम करीत आहे आणि आजपर्यंत ९५ लखाहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले आहेत. MKCL १४व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवीत आहोत. याचाच एक भाग म्हणून MKCLने दि. ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी तसेच खुल्या गटासाठी ‘महा आय. टी. जिनियस’ ही ई – टेस्ट आयोजित केली आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रु. २५ लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.

रोज लागणाऱ्या कंप्युटर अॅप्लिकेशनमधील प्रश्नांवर आधारित या ई – टेस्ट मधून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय जिल्हा, तालुका पातळीवर IT Genius होता येईल आणि स्वतःचे, शाळेचे / महाविद्यालयाचे नाव उज्वल करता येईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महा आय. टी. जिनियस eTest नोंदणीसाठीसाठी http://mahaitgenius.mkcl.org या संकेत स्थळावर लॉगइन करावे अथवा जवळच्या MS-CIT केंद्रात जाऊन कंप्युटरवर ही टेस्ट द्यावी असे आवाहन MKCL मार्फत करण्यात येत आहे.

HSC Result 2015

Dear HSC Students,

Your results will be declared tomorrow. You can visit this link http://hscresult.mkcl.org/ or your nearest MS-CIT Center tomorrow to view your results free-of-cost.

HSC Result 2015

HSC Result 2015

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सप्रेम नमस्कार

आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! एमकेसीएल नेहमीच नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि आपल्या नेटवर्क पार्टनर्सच्या मदतीने समाज प्रबोधन आणि विकासासाठी प्रयत्नशील असते. मराठी भाषेस इतर प्रादेशिक भाषांप्रमाणेच मानाचे स्थान प्राप्त व्हावे आणि जगभरात त्याचा वापर वाढवा यासाठी ‘आयटीत मराठी, ऐटीत मराठी ’ असा एक छोटा कोर्सही विनामूल्य आपल्या MS-CIT केंद्रांमधून दिला आहे. विविध आयटी सुविधा व टूल्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या जमान्यात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल म्हणून जर आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी! सोप्या मराठीत आयटी सुविधा व टूल्सची माहिती देणारा हा कोर्स आपण सर्वांनी पाहावा तसेच आपल्या घरातील सर्वांना आणि मित्रपरिवारालाही सांगावे हि नम्र विनंती.

देऊ आपले दोन तास, घेऊ मराठीचा ध्यास!

कोर्स मधील काही ठळक वैशिष्ट्ये :

  • कंप्यूटरवर मराठीत टायपिंग किंवा ईमेल करणे अगदी सोपे
  • गुगलवर मराठीतून माहिती शोधणे काही सेकंदात
  • मोबाइलवर मराठीतून एस.एम.एस एका मिनिटात
  • नातेवाईकांबरोबर मराठीतून चॅट म्हणजे भारीच
  • माझा ब्लॉग मराठीतचं कारण माझ्या भावना माझ्या मातृभाषेत
  • अवघड इंग्रजी शब्दांचे मराठी भाषांतर चटकन

Career guidance दि १ मार्च रोजी गणेश कला क्रीडा येथे ‘मैफल वक्तृत्वाची’ हा करियरउपयोगी कार्यक्रम

दि १ मार्च रोजी गणेश कला क्रीडा येथे ‘मैफल वक्तृत्वाची’ हा करियरउपयोगी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये श्री बाबासाहेब पुरंदरे, श्री रघुनाथ माशेलकर, श्री विजय भटकर, श्री अविनाश धर्माधिकारी, श्री विवेक सावंत हे किर्तिवंत मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. तरी आपण स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच आपल्या केंद्रात या कार्यक्रमाचा प्रचार करून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कार्यक्रमास येण्यास प्रोत्साहित करावे.

Career Guidance Information

Career Guidance Information

How to create a Processfolio?

प्रिय नेटवर्क पार्टनर,

Processfolio बनवण्यासाठी खालील बाबींची नोंद घ्यावी.

आपल्याला माहीत आहेच की, या वर्षीपासून (जानेवारी २०१५ पासून) प्रत्येक learner ने स्वतःच्या आउटपुट्सच्या बरोबरीने ते आउटपुट कसे बनविले याचे व्हिडिओ (Processfolio) सुद्धा रेकॉर्ड करायचे आहेत. तयार झालेले हे Processfolio व्हिडिओ, कोर्समधल्या त्या त्या ठिकाणी Processfolio या नोडवर अपलोड करायचे आहेत.

हे Processfolio कसे बनवायचे? आणि त्यासाठी कुठली tools किंवा software वापरायची, याबद्दलची माहिती देणारे २ व्हिडिओ खालील लिंक्स मधून तुम्हाला डाऊनलोड करता येतील.

Processfolio बनवण्यासाठी वापरायची tools कशी डाऊनलोड व इंस्टाल करावी? (eLecta Live Screen Recorder Format Factory)

http://fileserver.mkcl.org/centerdownload/ALC/Download%20and%20Installation_eLecta%20and%20FormatFactory%201.mp4

http://fileserver.mkcl.org/erainstaller/Processfolio.ini

Processfolio कसा बनवावा?

http://fileserver.mkcl.org/centerdownload/ALC/How%20to%20work%20with%20eLecta%20and%20FormatFactory.mp4

The Opportunity for You to Join Us is Here

Internship Opportunity with MKCL

Internship Opportunity with MKCL

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 582 other followers

%d bloggers like this: