महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल

 

भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री. राजीव गांधी यांनी संगणक क्रांतीचा पुरस्कार करुन २१ व्या शतकातील ज्ञानाधिष्ठित विकासाची संकल्पना भारताला दिली. त्यांच्या २१ व्या शतकातील पहिल्या जन्मदिनाचे औचित्य लक्षात घेऊन दिनांक २० ऑगस्ट २००१ रोजी, महाराष्ट्र शासनाने समाजातील डिजिटल दरी दूर करुन व्यापक प्रमाणावर संगणक साक्षरतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ तथा MKCL या संस्थेची स्थापना केली. MKCLने ज्ञानयुगातील विकासाच्या नवनवीन संधी माहिती तंत्रज्ञानाच्या समुचित वापरातून महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. या प्रयत्नातून नव्या परिवर्तनशील ई-शिक्षणाचे अभिनव प्रारूप साकारत आहे आणि त्याला आपल्या देशात व परदेशात उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ई-शिक्षणाबराबरच महामंडळाने अभिनव ई-प्रशासन सेवा व ई-सबलीकरण सेवा राज्यात सर्वदूर उपलब्ध करुन लक्षावधी नागरिकांना डिजीटल तंत्रज्ञानाचे फायदे दैनंदिन जीवनात घेण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे. या वर्षी MKCL आपल्या यशस्वी वाटचालीचे पहिले दशक पूर्ण करुन दुस-या दशकात पदार्पण करीत आहे.  यापुढेही MKCLद्वारे महाराष्ट्राच्या व देशाच्या शैक्षणिक, सामजिक आणि औद्योगिकक्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वांगीण विकास साधण्याचे बहुमोलाचे कार्य अविरत चालू राहिल…..

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल

MKCL चे राज्यव्यापी महानेटवर्क

 • संपूर्ण महाराष्ट्रात संगणक प्रशिक्षणाकरिता ५०००+  अधिकृत अध्ययन केंद्रांचे महानेटवर्क.
 • अद्ययावत हार्डवेअर व सॉफ्टवेअर्सने सुसज्ज असलेले ४०००० इंटरनेट-रेडी संगणकाचे राज्यव्यापी जाळे.
 • राज्यातल्या शहरी, निमशहरी, ग्रामीण, आदिवासी व डोंगराळ भागांतही नेटवर्कमार्फत सक्षम ई-लर्निंग, ई-प्रशासन व ई-सबलीकरण सेवा व सुविधांचे वितरण.
 • ई-लर्निंग, ई-गव्हर्नन्स व ई-एंपॉवरमेंट क्षेत्रात राज्यव्यापी सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ व बौद्धिक संपदा निर्मिती.
 • दहा वर्षात महानेटवर्कची रु.१३९० कोटींची उलाढाल.
 • नेटवर्कमार्फत आजपर्यंत १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त लोकांना शिक्षण-प्रशिक्षण, सेवा आणि ई-सुविधा.

विविध उपक्रम व सेवा

 • ६० लाखापेक्षा जास्त जिज्ञासूंना गेल्या दहा वर्षांत MS-CIT या माफक शुल्कातील, अद्ययावत व परिपूर्ण कंप्यूटर साक्षरता कोर्समार्फत दर्जेदार प्रशिक्षण व त्यामार्फत महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे संगणक साक्षर राज्य बनविण्यात यश.
 • वर्ल्ड क्लास अॅकॅडमी फॉर व्होकेशनल एक्सलन्स (WAVE) अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रमाणित रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देणारे अनेक नवे अभ्यासक्रम.
 • डिजीटल युनिव्हर्सिटी  प्रकल्पामार्फत १२ विद्यापीठांतील १२ लाख विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रशासकीय व शैक्षणिक ई-सुविधा.
 • ‘ओअॅसिस’ या संगणक प्रणालीतून ३८ लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे सुलभ ऑनलाईन प्रवेश व १३ लाख उमेदवारांना शासकीय सेवा – प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा व माहिती सेवा.
 • ‘डिजीटल स्कूल’ या शालेय ई-शिक्षण प्रणालीला राष्ट्रीय पातळीवरील मानाचा eIndia पुरस्कार.
 • ‘टॅलेंट नर्चरन्स’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या उत्तमता विकास व प्रज्ञा संवर्धनासाठी विज्ञान व गणित ऑलिंपियाड अभियान, आंतरराष्टीय विज्ञान ऑलिंपियाडमध्ये भारतीय टिममध्ये प्रतिनिधित्व.
 • ६ ते ८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बहुविध बुध्दिमत्ता विकासासाठी राज्यभर ‘हॉबी होम्स’ ची निर्मिती.
 • ‘सेटस्’ सॉफ्टवेअर प्रणाली मार्फत विविध शासकीय महामंडळांना प्रतिवर्षी हजारो कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा खरेदीसाठी ई-टेंडरिंग सेवा.
 • राजस्थान राज्य सरकारसोबत राजस्थान नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना. राजस्थानातील १,४०,८०० विद्यार्थी संगणक प्रशिक्षित.
 • ओरीसा नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (OKCL) साठी ओरीसा सरकारची मान्यता
 • गुजरात, कर्नाटक व गोवा राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी श्रम मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे MKCL ची परीक्षण संस्था म्हणून निवड
 • देशातील १७ राज्यांमध्ये MKCL अभ्यासक्रम स्थानिक भाषांतून कार्यान्वित.
 • सौदी अरेबिया मध्ये ‘एम.के.सी.एल. अरेबिया लिमिटेड’ ची स्थापना. १० हजार सौदी विद्यार्थी संगणक प्रशिक्षित.
 • सिंगापूर आणि घाना या देशामध्ये MKCL– सिंगापूर आणि MKCL– घाना या संयुक्त संस्थांसाठी सामंजस्य करार
 • ‘एम्प्लॉयमेंट असिस्टंटस् सर्व्हीसेस टू यूथ EASY’ पोर्टल मार्फत तरुणांना रोजगार, शिष्यवृत्त्या, स्पर्धा परीक्षा तयारी, इ. सुविधा.

रोजगार निर्मिती

 • राज्यभर शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील २५ हजार युवकांना MKCL नेटवर्कमध्ये त्यांच्याच गावात माहिती तंत्रज्ञानावर आधारित हाय-टेक रोजगार व स्वयंरोजगार.
 • १ लाख युवकांना अप्रत्यक्षरित्या एम.के.सी.एल. नेटवर्कमध्ये त्यांच्या गावात रोजगार/व्यवसायाव्दारे उपजिविकेच्या संधी.

About MKCL
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) is a Public Limited Company to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general.

Leave a Reply for MKCL Corporate Blog

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: