MKCL आणि एड्नेक्सा तर्फे १० वीच्या परीक्षेदरम्यान सर्व विषयांवरील मोफत ऑनलाइन वेबिनार्सचे आयोजन

इयत्ता १० वीची शालांत परीक्षा आता थोड्याच दिवसात चालू होणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक शंका येतात, तसेच काही संकल्पना व्यवस्थित समजत नाहीत. तसेच परीक्षेच्या दिवसांतील तयारी, उत्तरपत्रिका लिहिण्याची पद्धत, वेळेचे नियोजन इत्यादी विषयांबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असते. मात्र प्रत्येक वेळी या शिक्षकांकडे जाणे शक्य होत नाही. अश्या वेळी technology ची मदत घेतल्यास विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन सहज मिळू शकते. म्हणूनच एड्नेक्सा संस्थेने मोफत वेबिनार्सचे आयोजन केले आहे.

 वेबिनार म्हणजे ऑनलाइन लेक्चर. सध्या प्रचलित असलेल्या व्हर्च्युअल लर्निंगचाच हा एक प्रकार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी संगणक व इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे . वेबिनारमध्ये अनुभवी तज्ज्ञ शिक्षक व विद्यार्थी ठराविक वेळी ऑनलाइन येतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांना एखादा topic किंवा concept हा real-time मध्ये शिकवतात. विद्यार्थी त्यांच्या शंका विचारू शकतात व शिक्षक त्यांना ऑनलाइन उत्तरे देतात. त्यांच्या शंकांचे निरसन करतात. दृक – श्राव्य (audio-visual) तंत्रज्ञानाचा पूर्णपणे यासाठी वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे वेबिनार सायंकाळी आयोजित केले जातात. इंटरनेट कनेक्शन असलेला महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी यामध्ये भाग घेऊ शकतो. तसेच, ज्या विद्यार्थ्यांकडे ही सुविधा उपलब्ध नाही असे विद्यार्थी MKCL च्या MS-CIT केंद्रांवर जाऊन वेबिनारचा लाभ घेऊ शकतात.

वेबिनार्स विद्यार्थ्यांसाठी मोफत (विनाशुल्क) असून इंग्लिश, सेमी-इंग्लिश आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. ज्यांना या वेबिनार्सचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी ९०११०३११५५/९०११०४११५५ या क्रमांकावर फोन करावा अथवा info@ednexa.com येथे मेल करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

या वेबिनार्स मध्ये अनुभवी आणि महत्त्वाच्या पदांवरील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक विषयाच्या धड्यांची उजळणी कशी करावी आणि पेपर कसे लिहावेत या बद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळणार आहे. साहजिकच, याचा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी खूप फायदा होईल असा संस्थेला विश्वास आहे.

 सुरवातीच्या काही वेबिनार्सचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

 

विषय

दिनांक-वेळ

शिक्षक

गणित HOTS (भाग पहिला)

सोमवार, २५ फेब्रुवारी, रा. ८ ते ९

संजय रानडे  

गणित HOTS (भाग दुसरा)

मंगळवार, २६ फेब्रुवारी, रा. ८ ते ९

संजय रानडे 

विज्ञान HOTS (भाग पहिला)

बुधवार, २७ फेब्रुवारी, रा. ८ ते ९   

सायली धाक्रस

विज्ञान HOTS (भाग दुसरा)

गुरुवार, २८ फेब्रुवारी, रा. ८ ते ९  

सायली धाक्रस

 अधिक माहितीसाठी कृपया  www.ednexa.com/sscwebinar या वेबसाईटला भेट द्यावी.

Advertisements

एम.एस.सी.आय.टी. केंद्रांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर विनामूल्य – सराव परीक्षा

एम.के.सी.एल. तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बीजगणित, भूमिती, शास्त्र आणि इतिहास या विषयांकरीता कंप्यूटरवरसराव परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नसंच आणि उत्तरे इंग्रजी, मराठी तसेच सेमी इंग्रजी पध्दतीमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील दहावीसाठी बसणा-या १६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होऊ शकेल. एम.के.सी.एल.च्या सुमारे ५००० हून अधिक एम.एस.सी.आय.टी.(MS-CIT) अधिकृत प्रशिक्षण केंद्रांमधून ही परीक्षा विद्यार्थ्यासाठी मोफत आहे.

या सराव परीक्षेकरीता ४०००० हून अधिक कंप्यूटर्स या केंद्रामध्ये उपलब्ध असतील. एम.के.सी.एल.च्या ईरा या सॉफ्टवेअर प्रणालीतून ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली असून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. केदार टाकळकर यांनी बोर्डाच्या आभ्यासक्रमावर आधारीत ऑबजेक्टीव्ह प्रश्नोत्तरे या सराव परीक्षांकरीता तयार केली आहेत. या परीक्षेस येणा-या विद्यार्थ्याला अभ्यासाचे प्लॅनिंग कसे करावे?परीक्षेदरम्यान आहार काय असावा ? पेपर सोडविण्याचे तंत्र याचेही मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शाळांनी करावा असे आवाहन एम.के.सी.एल. तर्फे करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी  विद्यार्थ्यांनी 09326552525 येथे संपर्क साधावा

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर विनामूल्य – सराव परीक्षा

एम.के.सी.एल. तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बीजगणित, भूमिती, शास्त्र आणि इतिहास या विषयांकरीता कंप्यूटरवरसराव परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नसंच आणि उत्तरे इंग्रजी, मराठी तसेच सेमी इंग्रजी पध्दतीमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील दहावीसाठी बसणा-या १६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होऊ शकेल. एम.के.सी.एल.च्या सुमारे ५००० हून अधिक एम.एस.सी.आय.टी.(MS-CIT) अधिकृत प्रशिक्षण केंद्रांमधून ही परीक्षा विद्यार्थ्यासाठी मोफत आहे.

या सराव परीक्षेकरीता ४०००० हून अधिक कंप्यूटर्स या केंद्रामध्ये उपलब्ध असतील. एम.के.सी.एल.च्या ईरा या सॉफ्टवेअर प्रणालीतून ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली असून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. केदार टाकळकर यांनी बोर्डाच्या आभ्यासक्रमावर आधारीत ऑबजेक्टीव्ह प्रश्नोत्तरे या सराव परीक्षांकरीता तयार केली आहेत. या परीक्षेस येणा-या विद्यार्थ्याला अभ्यासाचे प्लॅनिंग कसे करावे?परीक्षेदरम्यान आहार काय असावा ? पेपर सोडविण्याचे तंत्र याचेही मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शाळांनी करावा असे आवाहन एम.के.सी.एल. तर्फे करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी  विद्यार्थ्यांनी 09326552525 येथे संपर्क साधावा

MKCL आणि एड्नेक्सा च्या संयुक्त विद्यमाने १० वीपरीक्षेच्या तयारीसाठीऑनलाइन वेबिनार्स

एड्नेक्साआणि MKCL च्या संयुक्त विद्यमाने १० वीपरीक्षेच्या तयारीसाठीऑनलाइनवेबिनार्स

इयत्ता १० वीच्या शालांत परीक्षेला आता महिनाच राहिला आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास जोरात चालू झाला आहे. मागच्या वर्षीच १० वीच्या Science आणि Maths या विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. विषयांची व्याप्ती वाढली आहे. तसेच परीक्षेचे स्वरूप आणि गुणदान पद्धत (marking scheme) यातही बदल झाला आहे. महत्त्वाच्या धड्यांचा योग्य प्रकारे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रत्येक वेळी या शिक्षकांकडे जाणे शक्य होत नाही. अश्या वेळी technology ची मदत घेतल्यास विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन सहज मिळू शकते. नेमकी हीच गोष्ट ध्यानात घेऊन एड्नेक्सा या Online Education क्षेत्रातल्या संस्थेने MKCL च्या सहकार्याने मोफत revision वेबिनार्सचे आयोजन केले आहे.

वेबिनार म्हणजे ऑनलाइन लेक्चर. विद्यार्थ्यांना घरी राहूनच या लेक्चरचा लाभ घेता येतो. यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी संगणक व चांगला स्पीड असलेले ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांकडे ही सुविधा उपलब्ध नाही असे विद्यार्थी MKCL च्या MS-CIT केंद्रांवर जाऊन वेबिनारचा लाभ घेऊ शकतात.

वेबिनारमध्ये अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक व विद्यार्थी ठराविक वेळी ऑनलाइन येतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांना एखादा topic हा real-time मध्ये शिकवतात. विद्यार्थी त्यांच्या शंका विचारू शकतात व शिक्षक त्यांना ऑनलाइन उत्तरे देतात. त्यांच्या शंकांचे निरसन करतात. दृक – श्राव्य (audio-visual), digital whiteboard तसेच animations अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला जातो. एड्नेक्सा संस्थेने हे वेबिनार्स इंग्रजी / मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत (विनाशुल्क) आयोजित केले आहेत. तसेच, ज्यांना हे वेबिनार्सना real-time मध्ये हजर राहणे जमत नसेल, त्यांना याचे recording त्यांच्या सोयीनुसार कधीही ऐकता येणार आहे. घरी इंटरनेट कनेक्शन नसल्यास नंतर MKCL च्या कुठल्याही अधिकृत MS-CIT केंद्रावर जाऊन हे recording ऐकता येईल.

या वेबिनार्स मध्ये अनुभवी आणि महत्त्वाच्या पदांवरील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक मंडळाच्या Science आणि Maths विषयाच्या समन्वयक (co-ordinator) डॉ. सौ. सुलभा विधाते आणि डॉ. सौ. जयश्री अत्रे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ शिक्षक डॉ. अ. ल. देशमुख, आणि इतर नामवंत शिक्षक यामध्ये समावेश आहे. विविध विषयांच्या धड्यांची तयारी कशी करावी, theory कशी करावी, गणिते कशी सोडवावीत, HOTS प्रश्नांचा अभ्यास कसा करावा अश्या महत्त्वाच्या विषयांवरची माहिती या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. साहजिकच, याचा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी खूप फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे

वेबिनार्सचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

 

भूगोल व अर्थशास्त्र

इंग्रजी

– मंगळवार, १२ फेब्रुवारी, रात्री ८ ते ९

श्री. संदीप वाटवे

भूगोल व अर्थशास्त्र

मराठी / सेमी-इंग्रजी

– बुधवार, १३ फेब्रुवारी, रात्री ८ ते ९

श्री. संदीप वाटवे

इंग्रजी

मराठी / सेमी-इंग्रजी

– सोमवार, ११ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

– मंगळवार, १२ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

सौ. संगीता भिडे

हिंदी (५० मार्क्स) 

इंग्रजी / मराठी / सेमी-इंग्रजी

– सोमवार, १८ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

डॉ. सौ. यशश्री कर्वे  

हिंदी (१०० मार्क्स) 

इंग्रजी / मराठी / सेमी-इंग्रजी

– मंगळवार, १९ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

डॉ. सौ. यशश्री कर्वे  

गणित – भूमिती

मराठी

– गुरुवार, १४ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

– शुक्रवार, १५ फेब्रुवारी, दुपारी ३ ते ४

डॉ. सौ. जयश्री अत्रे

 

वेबिनार्ससाठी http://www.ednexa.com/sscwebinar या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा अधिक माहितीसाठी कृपया पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा : 9011041155 / 9326552525

 

MKCL Arabia Ltd participated in eLearning Exhibition & Conference in Riyadh

IMG-20130204-00080IMG-20130204-00077 IMG-20130204-00078

“CHANGE for BETTER” Magazine: Better World through Better People. Visit: changeforbetter.org.in/

Change for better

%d bloggers like this: