मॅक्सेल – महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस अवॉर्डस 2013

समान संधी, दर्जेदार व्यावसायिक शिक्षण भावी पिढी घडविण्यासाठी आवश्यकसुशिलकुमार शिंदे

                                                                  दि. 13 मे,2013

मुंबई, सोमवारः  मॅक्सेल – महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस अवॉर्डस 2013 TJSB बँकेच्या सहकार्याने अतिशय दिमाखदार सोहळ्यात 12 मे 2013 रविवारी केंद्रिय गृहमंत्री श्री. सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  त्या प्रसंगी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की देशाची भावी पिढी घडविण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेतच उद्योजकतेचे बाळकडू मिळविण्यासाठी देशातील प्रत्येक मुलाला समान संधी, दर्जेदार शिक्षण मिळवून देणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे”.  अल्पावधित मॅक्सेल अवॉर्डसना कॉर्पोरेट आणि उद्दोगविश्वात मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.  रविवारच्या सोहळ्यासाठी पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, फायनान्शियल टेक्नॉलॉजिस्ट कंपनीचे अध्यक्ष श्री. जिग्नेश शहा, ”मॅक्सेल फाउंडेशन” चे संस्थापक आणि विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार, मॅक्सेलचे प्रमुख सल्लागार निवृत्त न्यायमूर्ती श्री. अरविंद सावंत, श्री. सुनिल देशमुख आणि उद्योग जगतातील तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

“उद्योजकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन खेडेगावात दर्जेदार रोजगाराच्या संधी उपब्लध कराव्यात, तसेच देशातील प्रत्येक मुलाला व्यावसायिक आधुनिक शिक्षण मिळाले तरच देशाची प्रगती होइल”, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले; तर पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या बीज भाषणात उपस्थितांना संदेश दिला की, ज्ञानाचे रुपांतर धनात करुन सरस्वतीकडुन लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग अवलंबवा. देशात 120 कोटी लोकसंख्या नसून 120 कोटी मेंदू आहेत.  देशाची प्रगती लोकांच्या विचार करण्याच्या पध्दतीवर अवलंबून आहे. नाविन्यपूर्ण शोध हे उद्योजकतेचे द्योतक आहे. तर ”मॅक्सेल फाउंडेशन” चे संस्थापक श्री. नितीन पोतदार यांनी मॅक्सेल ऍवार्ड ही स्पर्धा नसून पुढच्या पिढीसमोर आदर्श निर्माण करुन त्यांना दिशा देण्याचा एक प्रयत्न आहे; ते पुढे म्हणाले की  मराठी शाळांमध्ये करिअर गाईडन्स हा विषय इतिहास, भुगोल, नागरिक शास्त्र या विषयांप्रमाणेच शिकवला गेला पाहिजे तरच आपण नोकरी देणारे हात निर्माण करू शकू, असे प्रतिपादन केले. श्री. सुनिल देशमुख यांनी पुढील काळात उद्योगक्षेत्रात महिलांचा वाटा महत्त्वाचा असेल असे सांगून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

प्राज इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन श्री. प्रमोद चौधरी यांना या वर्षीच्या `मॅक्सेल लाईफ-टाईम अचिव्हमेंट’ ने गौरवण्यात आले. `मॅक्सेल ऍवार्ड फॉर एक्सलन्स इन बिझनेस लीडरशीप’ हा पुरस्कार मर्सिडिज बेन्झ इंडियाचे कॉर्पोरेट व्यवहार व मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक श्री. सुहास कडलासकर व अलाहाबाद बँकेच्या विद्यमान अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती शुभलक्ष्मी पानसे यांना प्रदान करण्यात आला. `मॅक्सेल ऍवार्ड फॉर एक्सलन्स इन एन्त्राप्रेन्युअरशीप’ ह्या पुरस्काराने गद्रे मरिन एक्स्पोर्ट्स कंपनीचे मालक व उद्योजक श्री दीपक गद्रे व युएस एअरोटीम, ओहायो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास काकडे यांना सन्मानित करण्यात आले. मॅक्सेल ऍवॉर्ड फॉर एक्सलन्स इन इनोव्हेशन हा पुरस्कार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक श्री. विवेक सावंत, मनोरमा इन्फोसोल्युशनच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी दानीगोंड यांना प्रदान करण्यात आले.

 

Maxell Awards 2013 Group Photo for Press

 

Advertisements

About MKCL
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) is a Public Limited Company to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general.

Leave a Reply for MKCL Corporate Blog

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: