एम के सी एल निर्मित मालिका ‘ माझी शाळा’ 20 ऑक्टोबर पासून दर रविवारी सकाळी 9:30 वा. दूरदर्शनवर. नक्की बघा.

MKCL प्रस्तुत

सुमित्रा भावे – सुकथनकर कृत

 माझी शाळा – दूरदर्शन सह्याद्री मालिका

 आजच्या काळात वैश्विकरणामुळे जगण्याचे संदर्भ बदलत आहेत, पूर्वीपेक्षा आजच्या काळातील जगण्याचे निकष वेगळे आहेत. आजच्या पिढीच्या मनात एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालाय. जग जवळ आल्यामुळे वेगवेगळया संस्कृतींची सरमिसळ झाली आहे आणि कशातून काय घ्यावं, काय आपलं आहे, काय सोडावं हे कळत नाहीये. पश्चिमेचा प्रमाणीकरणावर असलेला भर आणि आपल्याकडची विविधता ह्याची जोडी कशी जमवायची हे कोडं अजून उलगडलेलं नाही. यश, अपयशाच्या व्याख्या बदलत आहेत. त्यात रोज नवनवीन संशोधन समोर येतंय. आपल्याकडचं जुनं उकरून बघितलं तर अनेक गोष्टी सापडतील पण त्यांबद्दल फारसा अभ्यास झाला नसल्यानं काही तरी नवं सापडल्याचा देखील भाव येतोय. ह्यात नवीन पिढीला, येणाऱ्या काळासाठी घडवणं हे एक मोठं आव्हान आहे.

मेंदूच्या नव्या संशोधनाचे निष्कर्ष, हातानं काम करत होणारं शिक्षण, मुलाची निर्णय क्षमता विकसित करणं, विचार करण्याची प्रक्रिया अंगिकारणारं हे येणाऱ्या पिढीसाठी खूप आवश्यक आहे. नुसत्या घोकंपट्टीवर, गुण आधारित परीक्षा पद्धतीच्या मुल्यमापनावर, शिस्त, शिक्षा ह्यांसारख्या वर्तनवादी संकल्पनांवर आधारलेल्या शिक्षणापेक्षा, कृतीतून, स्वनिर्णयावर आधारलेलं शिक्षण हेच खरं शिक्षण आहे ह्या तत्वावर पुढचं सर्व शिक्षण आधारलेलं हवं. शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्याने ‘शिकणं’ महत्वाचं हे तत्व अंगीकारून शिक्षकाने ‘सुलभकाची’ भूमिका सहज स्वीकारणं हे ज्ञानसंरचनावाद रुजण्यासाठी खूप महत्वाचं आहे.

शाळा, शिक्षण, पालकत्व, विद्यार्थी, ज्ञान, माहिती, काम, शिक्षक, तंत्रज्ञान आणि असेच अनेक शब्द सतत बोलण्यात येत असतात. हे फक्तं शब्द नसून महत्वाचे मुद्दे आहेत हे शिक्षणात काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना माहित असतं आणि त्या बद्दल अनेक पातळ्यांवर काम देखील सुरु आहे. शिक्षण हे सर्वांना समान मिळावं, सार्वत्रिक असावं, ज्ञान मिळवण्यासाठी असावं, काम आणि बुद्धीची सांगड असलेलं असावं, आनंद देणारं, शारीरिक – मानसिक दृष्ट्या सुदृढ करणारं असावं, बालविकास केंद्री असावं ह्या बद्दल सर्वांचं एकमत आहे, फक्त कामाची पद्धत आणि माध्यम हाच काय तो फरक असू शकतो.

MKCL ही शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करणारी संस्था आणि विचित्र निर्मिती हे  दृकश्राव्य माध्यमातून समाजापर्यंत पोचण्याचं काम करणारं, सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर ह्या दिग्दर्शक द्वयीचं कला निर्मिती क्षेत्र, दोघांच्या एकत्र कामातून तयार होतेय ‘माझी शाळा’.

‘माझी शाळा’ ही दूरदर्शन – सह्याद्री वाहिनी साठी निर्मित 40 भागांची मालिका आहे, जी येत्या 20 ऑक्टोबर पासून दर रविवारी सकाळी 9:30 वा. दाखवली जाईल आणि त्याच भागाचं पुनर्प्रसारण पुढच्या शनिवारी रात्री 9 वाजता होईल.

माझी शाळा ह्या मालिकेचे सर्व 40 भाग कथानकाच्या स्वरूपाचे असतील. ज्ञानसंरचनावाद ह्या संकल्पनेवर रचलेले आणि शाळा, शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वच्छता, विज्ञान, इतिहास, भूगोल, भाषा, संगणक, पर्यावरण, गणित, ह्या विषयांशी संबंधित तत्व गोष्टींच्या स्वरुपात मांडले जातील. सर्व कथा सुमित्रा भावे ह्यांनी लिहिलेल्या आणि मालिकेचं शीर्षक गीत आणि इतर गीते सुनील सुकथनकरांनी रचलेली. दिग्दर्शन सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर ह्याचं. मालिकेच्या विविध भागांचे चित्रिकरण महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात करण्यात येईल ज्यामुळे महाराष्ट्राची भौगोलिक आणि सामाजिक विविधता दिसत राहील.

सर्व प्रभाग एका धाग्याने जोडलेले असतील, तो म्हणजे एका ‘मुक्त शिक्षण संशोधन केंद्रात’ शिक्षणावर सहभागी पद्धतीनं संशोधन करणारे 4 शिक्षक आणि त्यांचे प्रकल्प प्रमुख. ह्या 5 पात्रांमध्ये घडणाऱ्या चर्चेमुळे शिक्षणातील तात्विक मुद्दे पुढे येतील आणि त्यावर अधिक चर्चा घडवून आणली जाईल. काही वेळा घडणारी कथा हा त्यांचा स्वतःचा अनुभव असेल किंवा त्यांनी ऐकलेली, वाचलेली घटना ज्याच्या माध्यमातून ज्ञानसंरचनावाद समजून घेता येईल.

दूरदर्शन (सह्याद्री) हे खेडोपाडी पोचलेलं माध्यम आहे. त्यामुळे असा विश्वास ठेवता येतो की गावोगाव, निमशहरी भागात आणि शहरात देखील काम करणारे शिक्षक, शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षणात काम करणाऱ्या संस्था, प्रसार माध्यमं, सामाजिक संस्था ह्यांना देखील ह्या मालिकेचा आपापल्या कामात उपयोग करून घेता येईल.

शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देणं ही आजच्या काळाची गरज आहे. MKCL च्या कामाचे मुख्य अंग ज्या 6 तत्वांवर आधारलेले आहे – Bigger, Better, Deeper, Faster, Wider आणि Cheaper त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दृकश्राव्य माध्यम हे सर्वात उपयोगाचे आहे आणि ‘माझी शाळा’ ही मालिका त्याचाच एक प्रयत्न असेल.

आजच्या शिक्षण पद्धतीत बदल घडावे म्हणून अनेक लोक विविध पातळ्यांवर झटत आहेत. अनेक संस्था, व्यक्ती तळागाळातील लोकांच्या शिक्षणाचे हक्क, धोरणात्मक बदल, कायदे, शासन यंत्रणेत परिवर्तन, शासन यंत्रणेबाहेर शिक्षणाचे प्रयोग करत आपल्या देशात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. MKCL आणि विचित्र निर्मिती तर्फे ही मालिका बनवण्यामागची भूमिका ह्याच बदलाच्या प्रक्रीयेमध्ये शामिल होण्याची आहे.

येत्या रविवार पासून सुरु होणाऱ्या मालिकेसंदर्भात, प्रेक्षकांना जर काही सूचना, सल्ले, प्रतिक्रिया पाठवायच्या असतील तर दूरदर्शनला किंवा विचित्र निर्मितीला पाठवाव्यात. शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना जर काही मुद्दे सुचवायचे असतील तर अवश्य पाठवावे. त्याबद्दल निश्चित विचार केला जाईल. सहभागी पद्धतीनी केलेलं संशोधन आणि त्यातून निघालेले मुद्दे हेच परिवर्तन घडवू शकतील हे निश्चित. mazi-shala_V1_for-social-media

Advertisements

About MKCL
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) is a Public Limited Company to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general.

Leave a Reply for MKCL Corporate Blog

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: