बारावीचा ऑनलाईन निकाल मोफत पाहण्यासाठीची सुविधा, आता महाराष्ट्रातील ५५०० MS-CIT केंद्रांवर

बारावीचा निकाल२ जून ला दुपारी १ वाजता ऑनलाईनजाहीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील १४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एकाच वेळी इंटरनेट, कंप्यूटर व प्रिंटरची गरज भासणार आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या महाराष्ट्रातील ५५०० हून अधिक MS-CIT सेंटर्सवर ६०,००० पेक्षा जास्त इंटरनेट रेडी कंप्युटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईननिकाल विनामूल्य उपलब्ध करुन देण्याची विशेष परवानगी SSC बोर्डातर्फे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाला मिळाली आहे. हा निकाल MS-CIT केंद्रांवर मोफत पाहता येईल व प्रिंटही मिळेल अशी विशेष व्यवस्था प्रत्येक सेंटरवर केली गेली आहे.

तसेच बारावीनंतर करिअरउपयोगी कोणकोणते शैक्षणिक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत यासबंधित दृकश्राव्य फिल्म्स विद्यार्थ्यांना या सेंटर्सवर मोफत पाहायला मिळणार आहेत. ‘बारावीनंतरचे शैक्षणिक पर्याय’, MKCL Finishing School, ‘शास्त्र शाखा आणि इंजिनिअरींग क्षेत्रांतील करिअर’, ‘व्यावसायिक अभ्यासक्रम आणि करिअर’या विविध विषयांवरील या छोट्या फिल्म्समध्ये प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉक्टर श्रीराम गीत आणि श्री विवेक वेलणकर यांचा सहभाग आहे.

बारावीचा निकाल बोर्डाच्या नियमांप्रमाणे १ वाजल्यानंतर सर्व MS-CIT सेंटर्सवर उपलब्ध असेल.विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांनी नजीकच्या MS-CIT सेंटरमध्ये बोर्डाने दिलेला आसन क्रमांक आणि आईचे नाव नोंदवावे अशी विनंती MKCL तर्फे करत आहोत कारण यावर्षी बोर्डाने दिलेल्या सुचनांनुसार आसन क्रमांकासोबत आणि आईचे नावही साईटवर देणे आवश्यक असणार आहे.

About MKCL
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) is a Public Limited Company to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general.

Leave a Reply for MKCL Corporate Blog

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: