शासकीय परिपत्रकासंबंधीच्या वृत्तांबद्दल स्पष्टिकरण

मित्रहो,

सप्रेम नमस्कार.

विवध दैनिकात व इलेक्ट्रॉनिक माध्यमांत दिनांक ५ सप्टेंबर, २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या एका शासन परिपत्रकाबद्दलचे वृत्त टोकाच्या मतप्रदर्शनासह व अतार्किक निश्कार्षांसह प्रसिद्ध झाले. ते वाचून/बघून MKCL चे अनेक सहकारी, हितचिंतक, केंद्रचालक यांना धक्का बसला व त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. त्यामुळे मी खालील स्पष्टिकरण देत आहे.

सदर शासकीय परिपत्रकात शासकीय विभागांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सेवा घेताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबद्दल कॅगच्या खालील दोन प्रमुख शिफारशी दिलेल्या आहेत:

१.      महाराष्ट्र ज्ञान महामंडळास प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी भरती, आज्ञावली विकास अथवा अन्य कोणत्याही स्वरुपाची कामे थेटरित्या देऊ नयेत.

२.      कोणत्याही स्वरूपाचे सेवाविषयक काम देताना मुंबई वित्तीय नियम, १९५९ च्या नियम ५८ व १०७ चे पालन करूनच या महामंडळाच्या सेवा घेण्यात याव्यात.

खरे तर २००६ पासून प्रलंबित असलेल्या व कॅगने २०१३ सालीच निदर्शनास आणलेल्या प्रशासकीय त्रुटीच्या दुरुस्तीचे हे विलंबाने प्रसिध्द झालेले परिपत्रक आहे. असे परिपत्रक प्रसिध्द होण्यापूर्वीच विविध शासकीय विभागांनी MKCL ला थेटरित्या नव्हे तर खुल्या निविदा पद्धतीने कामे देण्यास गेल्या दोन वर्षापूर्वीच सुरुवात केली आहे.

तसेच २००६ मध्ये संपुष्टात आलेल्या या शासन निर्णयाचा तो अस्तित्वात असतानाही MKCL ने कुठलेही काम मिळवण्यासाठी कधीही पाठपुरावा केलेला नाही. त्याच्या अस्तित्व काळातही MKCL च्या पूर्णपणे विस्मृतीत गेलेला हा शासननिर्णय होता. वरील बातम्या प्रसिध्द झाल्यावर बारा-तेरा वर्षांपूर्वीच्या या निर्णयाच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या.

आतापर्यंत मिळालेली कामे ही MKCL ची सेवा पसंत असल्यामुळे त्या त्या शासकीय विभागांकडून व त्यांनीच केलेल्या सेवाशुल्क निश्चीतीतून वेळोवेळी मिळत गेली. क्वचित प्रसंगी पसंतीस न उतल्याने काही विभागांनी अशी कामे इतरांना दिली. काहींनी तसे करून पुन्हा ती MKCL ला दिली. कारण आतापर्यंत MKCL ला या शासन निर्णयातही कधीच मक्तेदारी(!) नव्हती व त्यामुळे ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

MKCL च्या सेवांचा दर्जा व शुल्क स्पर्धात्मकतेत कुठेच कमी नसल्यामुळे गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य सात राज्यांमधील अनेक शासकीय विभाग वरील वित्तीय नियमांनुसार निविदा काढतात व MKCL ची त्यात निवड व फेरनिवड होत असते. इतकेच नव्हे तर भारतातील नामवंत आणि मोठ्या खाजगी संस्था व कंपन्याही MKCL कडून या सेवा घेत आहेत हे मी अभिमानाने नमूद करू इछितो.

तसेच “MKCL ही कंपनी कुठल्या राजकीय पक्षाच्या मातबर नेत्याशी संबंधित आहे(!)” हे खोडसाळ विधान एकतर या वृत्तपत्रांनी मागे घ्यावे अन्यथा त्याचे पुरावे द्यावे.

“वरील कामे MKCL मार्फत करू नयेत असे शासकीय विभागांना कळविण्यात आले आहे” हे वृत्त चुकीचे असून ती थेटरित्या न देता निविदा पद्धतीने (वित्तीय नियमानुसार) करावी असा शासनाच्या परिपत्रकात  स्पष्ट उल्लेख आहे.

उपरोक्त परिपत्रकातील ‘कॅग’ च्या अहवालाचा संदर्भ हा शासकीय विभागांच्या लेखापरीक्षाणाबद्दल आहे. MKCL मध्ये शासनाचे भागभांडवल ५१% पेक्षा कमी असल्यामुळे MKCL चे लेखापरीक्षण ‘कॅग’ मार्फत होत नाही. त्यामुळे “MKCL च्या कारभाराबाबत ‘कॅग’ च्या अहवालात वित्तीय अनियमितता आढळून आल्या” हे विधान पूर्णपणे चुकीचे व बिनबुडाचे आहे.

काही वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या साध्या प्रशासनिक दुरुस्तीचे एका सनसनाटी वृत्तात रुपांतर करण्यासाठी बरेच बौद्धिक श्रम घेतले, शब्द सामर्थ्य खर्ची घातले त्याबद्दल कालाय तस्मै नम: एवढेच म्हणणे उचित ठरेल. यापुढे माध्यमातून प्रसिध्द होणाऱ्या अगदी आपल्या विरोधकांसंबंधीच्या आपल्याला क्षणिक सुखावणाऱ्या वृत्तावरही मूळ संकेतस्थळावर/ मूळ स्रोतात जावून शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये ही नम्र प्रार्थना.

MKCL ने पाठवलेले स्पष्टीकरण माध्यमे त्वरित प्रसिद्ध करतील अशी आशा करतो.

या मन:स्ताप देणाऱ्या अन्यायकारक वृत्ताच्या प्रसिद्धीनंतर तुम्ही सर्वांनी चहूबाजूंनी व तात्काळ व्यक्त केलेल्या विलक्षण सहानुभूतीबद्दल आणि MKCL वरील निर्व्याज प्रेमाच्या आणि विश्वासाच्या प्रकटनाबद्दल तुमचे किती आभार मानू? भारावून गेलो आहे..

आपला स्नेहांकित,

विवेक सावंत

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, MKCL

Advertisements

About MKCL
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) is a Public Limited Company to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general.

Leave a Reply for MKCL Corporate Blog

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: