MS-CITने एक कोटी विद्यार्थीसंख्येचा टप्पा ओलांडला

अवघ्या महाराष्ट्राला ‘डिजिटल महाराष्ट्र’ कसं करता येईल याचा ध्यास घेवून सुरु केलेल्या आणि राज्यशासनाने प्रमाणित केलेल्या MS-CIT या कंप्यूटर कोर्सने १ कोटी विद्यार्थीसंख्येचा टप्पा नुकताच ओलांडला. गेल्या १४ वर्षात एकूण १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी MS-CIT कोर्स पूर्ण करून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य संगणक साक्षर राज्य बनविण्यात मोलाचं सहकार्य केले आहे. याविषयी बोलताना MKCL प्रतिनिधींनी सांगितले की सातत्याने बदलत असणाऱ्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संगणक-साक्षरतेबरोबरच कंप्यूटरचे स्मार्ट उपयोग शिकण्याकडे कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आधुनिक युगात मोबाईलबरोबरच कंप्यूटरलाही पर्याय नसल्याने दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण पाच लाख लाख विद्यार्थी तर प्रतिवर्षी ८.५ ते ९ लाख लोक MS-CIT या आंतरराष्ट्रीय दर्जाचा अद्ययावत संगणक प्रशिक्षणास प्रवेश घेतात. आणि तो शिकविण्यासाठी ५००० हजार Hi-Tech प्रशिक्षण केंद्रांचे नेटवर्क आहे ज्यामध्ये ७५००० इंटरनेट रेडी कंप्युटर्स आहेत व २५००० अनुभवी तज्ञ आणि तत्पर प्रशिक्षक काम करत आहे. हे दृश्य एका राज्यात जगाच्या पाठीवर कोठेही दिसलेले नाही.

शाळेमध्ये ९/१०वीच्या ICT या विषयाची तयारी करण्यासाठी सुट्टीत ७ वी आणि ८वीच्या मुलांनीही MS-CITला प्रवेश घेण्याचा नवीनच ट्रेंड यावर्षी दिसत आहे.

About MKCL
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) is a Public Limited Company to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general.

Leave a Reply for MKCL Corporate Blog

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: