महाराष्ट्रातील ५००० MS-CIT केंद्रांवर बारावीचा ऑनलाईन निकाल मोफत उपलब्ध

mkcl-logo_small

बारावीचा निकाल लवकरच ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एकाच वेळी इंटरनेट, कंप्यूटर व प्रिंटरची गरज भासणार आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या महाराष्ट्रातील ५००० हून अधिक MS-CIT सेंटर्सवर ६५,००० पेक्षा जास्त इंटरनेट रेडी कंप्युटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल विनामूल्य उपलब्ध करुन देण्याची विशेष परवानगी SSC बोर्डातर्फे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाला मिळाली आहे. हा निकाल MS-CIT केंद्रांवर मोफत पाहता येईल व प्रिंटही मिळेल अशी विशेष व्यवस्था प्रत्येक सेंटरवर केली गेली आहे.

बारावीचा निकाल बोर्डाच्या नियमांप्रमाणे १ वाजल्यानंतर सर्व MS-CIT सेंटर्सवर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांनी नजीकच्या MS-CIT सेंटरमध्ये बोर्डाने दिलेला आसन क्रमांक आणि आईचे नाव नोंदवावे अशी विनंती MKCL तर्फे करत आहोत कारण यावर्षी बोर्डाने दिलेल्या सुचनांनुसार आसन क्रमांकासोबत आईचे नावही साईटवर देणे आवश्यक असणार आहे.

%d bloggers like this: