‘महा आय. टी. जिनियस’ स्पर्धा

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच ITचा वापर रोजच्या जीवनात वाढवा याकरिता महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात ‘ICT’ हा विषय ५वी पासून समाविष्ट केला आहे. त्याचसोबत भारताच्या माननीय पंतप्रधानांनी नुकत्याच सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत लाखो नागरिकांना डिजिटल साक्षर करावयाचे आहे. MKCL गेली १४ वर्षे MS-CITच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता क्षेत्रात काम करीत आहे आणि आजपर्यंत ९५ लखाहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले आहेत. MKCL १४व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवीत आहोत. याचाच एक भाग म्हणून MKCLने दि. ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी तसेच खुल्या गटासाठी ‘महा आय. टी. जिनियस’ ही ई – टेस्ट आयोजित केली आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रु. २५ लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.

रोज लागणाऱ्या कंप्युटर अॅप्लिकेशनमधील प्रश्नांवर आधारित या ई – टेस्ट मधून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय जिल्हा, तालुका पातळीवर IT Genius होता येईल आणि स्वतःचे, शाळेचे / महाविद्यालयाचे नाव उज्वल करता येईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महा आय. टी. जिनियस eTest नोंदणीसाठीसाठी http://mahaitgenius.mkcl.org या संकेत स्थळावर लॉगइन करावे अथवा जवळच्या MS-CIT केंद्रात जाऊन कंप्युटरवर ही टेस्ट द्यावी असे आवाहन MKCL मार्फत करण्यात येत आहे.

Keep it up MKCL Team! Two of MKCL’s projects have cleared the Phase 2 of PCQuest Best IT Implementation Awards – 2012

Two of MKCL’s projects have cleared the Phase 2 of PCQuest Best IT Implementation Awards – 2012: Link for one of those is as under:

http://forums.pcquest.com/itimplementation/index.php?option=com_content&view=article&id=121:mkcls-software-activator&catid=14:other-projects&Itemid=61

Image